Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. संजय लठ्ठे यांचा जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत समावेश

डॉ. संजय लठ्ठे यांचा जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत समावेश

कोल्हापूर :
जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची ताजी यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. यात विवेकानंद कॉलेज कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांना सलग सातव्या वर्षी (२०२६) पुनर्मानांकन प्राप्त झाले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गतवर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीत डॉ. संजय लठ्ठे यांना स्थान लाभले होते. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. यंदा स्टॅनफोर्ड विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या सूची जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एक सूची संशोधकाच्या सार्वकालिक कारकिर्दीचा वेध घेऊन तयार केली आहे. दुसरी सूची वार्षिक कामगिरीवर आधारित आहे. ‘स्कोपस’ डाटाबेसवर आधारित या यादीसाठी १९६० ते २०२५ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा विचार करण्यात आला आहे. या दोन्ही सूचीमध्ये डॉ. संजय लठ्ठे यांना स्थान लाभले आहे.
डॉ. संजय लठ्ठे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे डॉ. भाऊराव दांगट तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे, आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.9 ° C
28.9 °
28.9 °
68 %
2.2kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

You cannot copy content of this page