Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा मोरजाई पठारावर पर्यावरण अभ्यास व प्लास्टिक संकलन उपक्रम

विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा मोरजाई पठारावर पर्यावरण अभ्यास व प्लास्टिक संकलन उपक्रम

कोल्हापूर :
वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची मोरजाई पठार, भुईबावडा व अणदूर धरण येथे क्षेत्रभेट उत्साहात पार पडली. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मोरजाई पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास करत विविध फुले, फुलपाखरे, पक्षी, कीटक व वन्यजीवांचे निरीक्षण व छायाचित्रण केले.
महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी मोरजाई पठारावर प्लास्टिक कचरा संकलनाचा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला कचरा संकलनासाठी मोठी थैली देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पाण्याच्या फेकून देण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, चॉकलेटचे वेष्टन व अन्य प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात संकलित केला. तसेच पर्यटक व भाविकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि वन्यजीव संवर्धनाचे आवाहन केले. निसर्गाचा अभ्यास करताना त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिला.
पर्यावरण विषय शिक्षक ए. आर. धस यांनी विद्यार्थ्यांना मोरजाई पठार परिसरातील जैवविविधता, वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व व संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निसर्गाचे निरीक्षण करत प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरण शिक्षण घेतले.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी प्राचार्य. डॉ. सी. बी. पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. क्षेत्रभेटीचे नियोजन नाकाडी एल. एस. यांनी केले. या उपक्रमात प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. सौ. वर्षा महाडिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रजिस्ट्रार एस. के. धनवडे, स्टाफ सेक्रेटरी यू. एच. तिजाईकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
80 %
3.2kmh
0 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page