Homeशैक्षणिक - उद्योग आहान पांडे बनला ‘अजियो’चा नवा चेहरा

आहान पांडे बनला ‘अजियो’चा नवा चेहरा

• ७ ऑक्टोबरपासून ‘ऑल स्टार्स सेल’
कोल्हापूर :
अभिनेता आहान पांडे हा ‘अजियो’चा नवा चेहरा बनला असून, तो कंपनीच्या २०२६ मधील फेस्टिव्ह कॅम्पेन ‘फेस्टिव्हल इज फेस्टिव्हलिंग’मध्ये झळकणार आहे. यासोबतच अजियोने सणासुदीच्या खरेदीसाठी तयारी सुरू केली आहे. अजियोची ‘ऑल स्टार्स सेल’ ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असली, तरी या सेलमधील किंमती आतापासूनच ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आहान पांडे याच्यासोबत तयार करण्यात आलेल्या या कॅम्पेनमध्ये सणासुदीच्या काळातील विविध लुक्स आणि स्टाइल्स सादर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना अजियोवर फॅशन, फुटवेअर, ॲक्सेसरीज, ब्युटी यांसह विविध श्रेणींमध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची खरेदी करता येणार आहे. अजियोच्या प्लॅटफॉर्मवर ९,००० हून अधिक ब्रँड्सचे विस्तृत पोर्टफोलिओ उपलब्ध आहे.
ग्राहकांसाठी जलद डिलिव्हरी आणि सुलभ रिटर्न्सवरही अजियोने विशेष भर दिला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ‘अजियो रश’च्या माध्यमातून ६०० हून अधिक शहरांमध्ये जलद डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे. तर नियमित डिलिव्हरी देशातील सर्व पिन कोडपर्यंत केली जाते.
आहान पांडे म्हणाला की, अजियो फॅशनला उत्साहपूर्ण, सोपे आणि वैयक्तिक बनवते. आपण काय परिधान करतो, त्यातून स्वतःला व्यक्त करता येते आणि हीच गोष्ट मला या ब्रँडशी जोडते. सणासुदीच्या हंगामासोबत अजियोसोबतच्या या प्रवासाची सुरुवात करताना मला खूप उत्सुकता आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
80 %
3.2kmh
0 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page