कोल्हापूर :
गायन समाज देवल क्लब, एन.सी.पी.ए. (मुंबई) आणि सिटी बँक यांच्या सहसंयोजनाने आयोजित ‘स्वरसप्तक’ सायंकालीन संगीत सभा नुकतीच उत्साहपूर्ण आणि संगीतपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या मैफलीत सुप्रसिद्ध गायिका पं. कृष्णा बोंगाणे यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मैफलीची सुरुवात राग पुरीया धनाश्रीने झाली. विलंबित एकतालातील ‘बल बल जावो’ ही बंदिश सादर केल्यानंतर झपतालातील मध्यलय बंदिश ‘तेरे दरस कि’ आणि तीनतालातील द्रुत बंदिश ‘सय्या मोरा परदेस’ यांनी मैफलीत रंगत आणली.
यानंतर राग मेघमध्ये झपतालातील मध्यलय बंदिश ‘गरज घटा बरसे’ आणि तीनतालातील द्रुत बंदिश ‘गगन गरज चमकत’ सादर करण्यात आली. पं. कृष्णा बोंगाणे यांच्या गायकीतील रागदारी, स्वरांची सफाई आणि भावपूर्ण मांडणीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शास्त्रीय गायनानंतर ‘येरी सखी मोरे पिया घर’ आणि ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या भक्तिरचनांनी वातावरण अधिक भावपूर्ण झाले. कार्यक्रमाची सांगता भैरवीतील ‘पोटापुरते देई विठ्ठला मायबापा’ या भावस्पर्शी रचनेने झाली.
‘स्वरसप्तक’ या उपक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत रसिकांना दर्जेदार संगीत मैफलींचा अनुभव सातत्याने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पं. कृष्णा बोंगाणे यांच्या सादरीकरणाला मिळालेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाची पावती ठरला.
यावेळी व्ही. बी. पाटील, गंधार डिग्रजकर, राजेंद्र पित्रे, सुबोध गद्रे यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ कलाकार, संगीतप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
‘स्वरसप्तक’मध्ये पं. कृष्णा बोंगाणे यांच्या गायनाने रंगली संगीत सभा
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
80 %
3.2kmh
0 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
31
°
Fri
29
°
Sat
29
°

