कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २०२६ मध्ये केएसए अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपदांसह उपविजेतेपद, उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. ही स्पर्धा मालवण, सिंधुदुर्ग येथे पार पडली.
११ वर्षांखालील मुलांच्या गटात रणवीर जाधवने विजेतेपद पटकावले, तर संयम चव्हाणने उपविजेतेपद मिळवले. निरंजन पाटीलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
१३ वर्षांखालील मुलांच्या गटात पुष्पम शाह व निरंजन पाटील यांनी उपांत्य फेरी गाठली. श्रीवत्स भाकरे व राजवीर गायकवाड यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात राजवीर साळोखेने विजेतेपद, तर जुनेद मगदूमने उपविजेतेपद मिळवले. राजवीर गायकवाड उपांत्य फेरीत पोहोचला, तर श्रीवत्स भाकरे व पुष्पम शाह यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात जुनेद मगदूमने उपविजेतेपद मिळवले. जयराज़ काजरेकर व राजवीर साळोखे यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात जयराज़ काजरेकरने उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटातही खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात इरा बी. हिने उपांपूर्व फेरी गाठली. १३ वर्षांखालील मुलींच्या गटात समृद्धी मानवेकरने उपविजेतेपद मिळवले. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात गीत जगतापने विजेतेपद, तर समृद्धी मानवेकरने उपांत्य फेरी गाठली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गीत जगतापने पुन्हा विजेतेपद पटकावले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या जोशीने विजेतेपद मिळवले, तर निहाली पाटील उपविजेती ठरली.
महिला गटात निहाली पाटीलने विजेतेपद पटकावले, अनन्या जोशीने उपविजेतेपद मिळवले, तर मधुरा शेंडुरेने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
या स्पर्धेत खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत के. एस.ए. च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या खेळाडूंना केएसएचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती, सेक्रेटरी माणिक व टेबल टेनिस सेक्रेटरी नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच प्रशिक्षक संग्राम चव्हाण व सहप्रशिक्षक विवेक कुंभार, शिवतेज खराडे व ओमकार गुरव यांनी मार्गदर्शन केले.
——————————
विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत केएसए खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
80 %
3.2kmh
0 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
31
°
Fri
29
°
Sat
29
°

