• विविध प्रवासी सेवा एकाच छताखाली उपलब्ध
कोल्हापूर :
शाहूपुरी व्यापारी पेठ येथील सेंट्रल ऑथराइज्ड रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले हे केंद्र आता कार्यान्वित झाले आहे.
हे केंद्र कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्स या फर्मच्या माध्यमातून कार्यरत असून, उमेश शहा हे संचालक आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या केंद्रामार्फत प्रवाशांना आरक्षणासह विविध प्रवासी सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी उमेश शहा यांचे सुपुत्र कौस्तुभ शहा हे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदवीधर असून, नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.
प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आरक्षणासोबतच विविध प्रवासी आणि पर्यटन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक उमेश शहा यांनी दिली.
या केंद्रामध्ये रेल्वेच्या विविध श्रेणींचे आरक्षण, ई-रेल्वे तिकीट, लक्झरी बस, रेडबस तसेच विमानसेवेचे बुकिंग करून दिले जाते. याशिवाय हॉटेल बुकिंग आणि मनी एक्स्चेंजची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच आयआरसीटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशातील विविध पर्यटनस्थळांसाठी टूर पॅकेज आणि प्रवासाचे नियोजन करता येते. शालेय व शैक्षणिक सहली, समूह सहली, कुटुंबीय तसेच इतर प्रवाशांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी स्टेशन मास्टर विजय पोद्दार, मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य बाबासाहेब निंबाळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, क्रिडाईचे सुजय होसमाने, बीडीओ मिलिंद टोणपे – कोठारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
——————————
रेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आ.अमल महाडिक यांच्या हस्ते उदघाटन
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

