कोल्हापूर :
ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही क्षणात रिपोर्ट देणाऱ्या अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण सोहळा कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये निमान्सच्या न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिता महादेवन यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजी, पॅथॉलॉजी प्रमुख डॉ. प्रतिमा मरजक्के उपस्थित होते.
शस्त्रक्रियेदरम्यान काढलेला ट्युमर कर्करोगाचा आहे की नाही किंवा कर्करोगाचा संपूर्ण भाग काढला गेला आहे की नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाला डॉक्टराना (शल्यचिकित्सकांना) अनेकदा सामोरे जावे लागते. असा काढलेला ट्युमर सर्वसाधारण पॅथॉलॉजी प्रक्रियेला अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागू शकतात, तर क्रायोस्टॅट मशीन वापरून फ्रोजन सेक्शन तंत्रज्ञानाद्वारे अंदाजे १०-१५ मिनिटांत आवश्यक माहिती मिळते. त्यामुळे शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टर रुग्णावर आवश्यक ते पुढील उपचार तात्काळ करू शकतात व रुग्णाला दिलासा मिळू शकतो. यामुळे ट्यूमरचे स्वरूप आणि सर्जिकल मार्जिनबद्दल त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. म्हणूनच क्रायोस्टॅटला खऱ्या अर्थाने “सर्जिकल पॅथॉलॉजीसाठीचे आपत्कालीन साधन” म्हटले जाऊ शकते.
मेंदूचे ट्यूमर ३०० पेक्षा जास्त प्रकारचे आहेत, ते अनेकदा एकमेकांसारखेच दिसतात. केवळ एच अँड ई स्टेनिंगद्वारे ट्यूमरचे अस्तित्व कळू शकते तर आयएचसी त्याचा प्रकार, ग्रेड आणि उपचारासंबंधी महत्त्वाची माहिती अधिक अचूकपणे निश्चित करण्यास मदत करते. इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा आयएचसी न्यूरोपॅथॉलॉजीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.
डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्युरो विभागाला जागतिक स्तरावर नेले आहे. या मशीनमुळे अशा स्वरूपाच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेला अधिक स्पष्टता येणार आहे. या अत्याधुनिक मशीन ट्रस्ट श्रेणीत कोल्हापुरात पहिल्यांदा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होत आहे. अशा टेस्ट करिता सर्वसाधारणपणे १५ हजारांचा खर्च येतो पण ह्याच तपासणी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर केवळ ५ ते ६ हजारात होणार असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पॅथॉलॉजी प्रमुख डॉ. प्रतिमा मरजक्के यांनी यावेळी केले.
या लोकार्पण सोहळ्याला सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर, डॉ. अंकुश पार्टे, डॉ. तनिष पाटील, डॉ. प्रशांत नाडेकर, डॉ. शंतनू पालकर, डॉ. सचिन पाटील, डॉ. विशाल खलाटे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण
Mumbai
clear sky
28.2
°
C
28.2
°
28.2
°
63 %
2.2kmh
5 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
30
°
Fri
30
°

