• प्राचार्य, प्राध्यापकांशी संवाद; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा
कोल्हापूर :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचार मोहिमेने सोलापूर शहरातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये वेग घेतला आहे. विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीची भूमिका मांडण्यात आली.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांची जाण असलेले आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे यांची प्रतिमा समर्थकांकडून मांडण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलने, संघटनात्मक उपक्रम तसेच विविध माध्यमांतून आवाज उठविण्यासोबतच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचारांचा व कार्याचा वारसा लाभलेल्या कौस्तुभ गावडे यांचे बालपणापासूनच शिक्षणक्षेत्राशी जवळचे नाते राहिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी, अपेक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने यांची त्यांना प्रत्यक्ष जाणीव असल्याचे प्रचारादरम्यान नमूद करण्यात आले.
या प्रचार मोहिमेदरम्यान सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विद्याविकास प्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक, ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक तसेच ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक या संस्थांना भेटी देण्यात आल्या. यावेळी प्राचार्य व प्राध्यापकांशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.
या संवाद दौऱ्यात प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्राचार्य डॉ. अनिल देशमाने, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, डॉ. विभूते, प्राचार्य डॉ. कुलकर्णी, डॉ. चव्हाण, प्राचार्य डॉ. सोनगे, प्राचार्य डॉ. तुकाराम चव्हाण, प्राचार्य डॉ. गजानन धरणे, प्राचार्य डॉ. महादेव चौगुले, प्राचार्य डॉ. विश्वजीत पोतदार यांच्यासह विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील प्राध्यापक सहभागी झाले.
सोलापूर शहरातील या प्रचार मोहिमेत प्र. प्राचार्य विवेक कोरे, प्रा. सिद्धेश्वर कोणदे, प्रा. मनोज पवार तसेच गुरुदेव कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत, कौस्तुभ गावडे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आले.
सोलापूर शहरातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील या व्यापक संपर्क मोहिमेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती मिळाल्याचे त्यांच्या प्रचारकांकडून सांगण्यात आले.
सोलापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

