Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त कारखान्याचे प्रति टन रुपये ५० प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

श्री दत्त कारखान्याचे प्रति टन रुपये ५० प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त कारखान्याने नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य देऊन जास्तीच्या दराची परंपरा जोपासली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने गळीतास उपलब्ध होणाऱ्या ऊसास हंगामात एक रकमी प्रतिटन ३४५० व सन २०२६ च्या दीपावलीपूर्वी उर्वरित प्रति टन रु. ५० असा एकूण प्रति टन रुपये ३५०० दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे कारखान्याने गळीतास उपलब्ध झालेल्या उसास प्रति टन ५० रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर दि. १७ ऑगस्ट रोजी वर्ग केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये कारखान्याने ११,७८,७०५ मे. टन उसाचे गाळप केले होते. गाळपास उपलब्ध झालेल्या या ऊसास हंगाम कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार एकरक्कमी विना कपात प्रति टन रु ३४५० प्रमाणे ऊस दर अदा केला होता. हंगाम सुरुवातीस व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे आता प्रति टन रुपये ५० प्रमाणे रुपये ५ कोटी ८९ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग केली आहे. गळीत हंगाम सन २०२६-२७ करिता कारखान्याने १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन गणपतराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक अनिलराव यादव, प्रमोद पाटील, इंद्रजीत पाटील, भैय्यासाहेब पाटील, अन्य संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई व खाते प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
6.2kmh
99 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page