कोल्हापूर :
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती सौ. पुजा पोवार, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, नगरसेविका सौ. पुर्वा राणे, सौ. अर्चना कोराणे, सौ. निलिमा पाटील व अधिकारी उपस्थित होते.
यानंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ बाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी सर्व अधिकाऱ्यांना पेनचा बॉक्स वाटप करुन सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना जिलेबी व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, कामगार अधिकारी राम काटकर, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थी -विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
——————————
महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
5.7kmh
97 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

