Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन सादर केले. यावेळी संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील व संस्था परिसरातील शाखा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. तसेच नशामुक्त महाराष्ट्र होणेसाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली.
यानिमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित केलेल्या समारंभात विवेकानंद कॉलेजमधील पुस्तक लेखक, नेट, सेट, पीएच.डी. पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते करण्यात आला.   उपस्थित गुरुदेव कार्यकर्त्यांना कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विराज जाधव, डॉ. कैलास पाटील, डॉ. अतिश पाटील, डॉ. संजय लठ्ठे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील यांनी केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. विकास जाधव, डॉ. नम्रता नरेवाडीकर, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, प्रा. संतोष कुंडले, डॉ. ई. बी. आळवेकर, डॉ. राजश्री पाटील, डॉ. बी. टी. दांगट, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. एम. आर. नवले, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, प्रशासकीय कर्मचारी यांनी केले. यावेळी संस्था परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
5.7kmh
97 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page