Homeशैक्षणिक - उद्योग डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील चार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची ‘तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्राम’ या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमिता सु. पाटील, गणेश ध. जाधव, शिवप्रसाद कृ. जाधव आणि ऋषिकेश सं. गुरव यांचा समावेश आहे. जगभरातील संशोधक विद्यार्थ्यांमधून ऊर्जा साठवणूक, सुपरकॅपेसिटर, इलेक्ट्रोकॅटलिसिस आणि हरित हायड्रोजन निर्मित क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन कार्याच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी प्रगत नॅनोमटेरियल्स, ऊर्जा साठवणूक प्रणाली आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
निवड झालेले विद्यार्थी तैवानमधील नॅशनल डाँग व्हा युनिव्हर्सिटी येथे ‘मशीन लर्निंग एडेड सर्च फॉर सेमीकंडक्टर नॅनोमटेरिअल्स सुटेबल फॉर ग्रीन हैड्रोजन जनरेशन’ या संशोधन कार्यशाळेत सहभाग घेणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकंडक्टर नॅनोमटेरियल्सचा शोध घेणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नॅशनल डाँग व्हा विद्यापीठामार्फत संशोधनासाठी आर्थिक सहाय्य व आंतरराष्ट्रीय संशोधन सुविधांसाठी तीन महिन्यांची संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये कार्य करण्याची, अत्याधुनिक उपकरणांवर संशोधन करण्याची तसेच आंतरराष्ट्रीय संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्यशाळेतील या सहभागासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यार्थ्याना आर्थिक पाठबळ प्रदान केले आहे.
या विद्यार्थ्यांना संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे तसेच संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. यु. एम. पाटील आणि डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
6.2kmh
99 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page