कोल्हापूर :
भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स’ राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याना मिळणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल निकिता व श्रेयस यांचे अभिनंदन केले.
‘इंडिया स्किल्स’ ही देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे. यामध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष कामाचा वेग याचा कस लागतो. ‘लँडस्केप गार्डनिंग’ सारख्या आव्हानात्मक प्रकारात दिलेल्या मर्यादित वेळेत निसर्गरम्य आराखडा तयार करणे, दगडी बांधकाम आणि झाडांची शास्त्रोक्त मांडणी अशा टप्प्यांतून या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी श्रेयस माने आणि निकिता कोळेकर या जोडीने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आहे. त्यांनी मुंबई येथे झालेय राज्य स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक तर अहमदाबाद येथे झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर आता नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ‘लँडस्केप गार्डनिंग’ मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल त्यांना ७५ हजार रुपये रोख, रौप्यपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी, राजस्थानचे उद्योग आणि क्रीडा मंत्री कर्नल राजवर्धन राठोड, महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, बिहारचे कौशल्य विकास मंत्री संजय सिंह ‘टायगर’, उत्तर प्रदेश व्यावसायिक शिक्षण मंत्री कपिल देव अग्रवाल, हरियाणाचे युवक कल्याण मंत्री गौरव गौतम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी श्रेयस व निकिता यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी इंडिया स्किल्स’ सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धेत मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, सर्जनशीलता आणि चिकाटी त्यांनी प्रभावीपणे दाखवून दिली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेचे नाव देशपातळीवर उजळले असून, पुढील ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेतही ते निश्चितच भारताचे नाव उंचावतील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, डेप्युटी रजिस्ट्रार आश्विन देसाई, विभाग प्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी, प्रा. शरद रणभिसे आदी उपस्थित होते.
——————————
डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेमध्ये रौप्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3
°
C
28.3
°
28.3
°
82 %
9.1kmh
100 %
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°

