Homeकला - क्रीडाविभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत डी. वाय. पाटील कॉलेज, साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस महिला व पुरुष स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक आणि मुलींच्या टेबल टेनिस संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दोन्हीही संघाची इंटर झोनल स्पर्धा अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल टेबल टेनिस महिला व पुरुष संघाचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
30 ° C
30.9 °
30 °
70 %
3.1kmh
82 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page