• शिक्षणासाठी १० हजार रुपयांपर्यंत मदत तर औषधांवर ५० टक्के सवलतीची सुविधा
कोल्हापूर :
पतीचे निधन झाल्यानंतर जिद्दीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या एकल मातांना आणि त्यांच्या मुला-मुलींना आधार देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एकल माता, एकल विद्यार्थी’ हा सामाजिक जाणिवेचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्याने पेलणाऱ्या मातांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘एकल विद्यार्थी’ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, आरोग्य आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला योग्य आधार देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याच उपक्रमांतर्गत गुरुवारी कोल्हापुरातील महाराष्ट्र हौसिंग सोसायटी येथे चंद्रकांतदादा पाटील सहाय्यता कक्षाच्या वतीने महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित एकल माता आणि त्यांच्या पाल्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देऊन त्यांचा सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एका प्रसंगातून मिळालेल्या प्रेरणेतून समाजातील अशा घटकांप्रती आत्मीयतेची भावना निर्माण झाली. एकल माता जिद्दीने आपल्या मुलांचा संसार आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. तुम्ही एकट्या म्हणून जो संसार चालवत आहात, त्याला थोडासा हातभार लागावा आणि तुमच्या मुलांच्या भविष्याला आधार मिळावा, या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहरातील आतापर्यंत १४५ एकल मातांची नोंद झाली असून, अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण व फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एकल मुला-मुलींच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या औषधांवर ५० टक्के सवलत देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच आरोग्याच्या गरजांमध्येही या कुटुंबांना आधार मिळणार आहे.
एकल माता आणि त्यांच्या पाल्यांना केवळ एका सणापुरती किंवा एका वेळची मदत न करता सातत्याने त्यांच्या सोबत राहणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक सणाला त्या सणाला पूरक अशा भेटवस्तू देण्यात येतील. तसेच दर दोन महिन्यांनी या कुटुंबांशी संपर्क ठेवून त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमाची दखल राज्य शासनानेही घेतली असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सुमारे ४६ लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पालकांची व कुटुंबांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे नमूद केले आहे.
याप्रसंगी सौम्या तिरोडकर, जुहीताई कुलकर्णी, वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर, विजय जाधव, राहुल चिकोडे, अंजली घोरपडे यांच्यासह एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
——————————
एकल माता आणि एकल विद्यार्थ्यांच्या पाठीशी चंद्रकांतदादा पाटील सहाय्यता कक्ष
Mumbai
broken clouds
30
°
C
30.9
°
30
°
70 %
3.1kmh
82 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

