Homeसामाजिकप्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांना ‘राष्ट्रीय विचार प्रेरणा’ पुरस्कार

प्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांना ‘राष्ट्रीय विचार प्रेरणा’ पुरस्कार

कोल्हापूर :
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील ग्रंथपाल व नॅकचे समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी पांडुरंग कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे आयोजित सोहळ्यात माजी आमदार ऋतुराज पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातून पुढे येत शिक्षण व समाजकार्याच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांबळे यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला. डॉ. शिवाजीराव कांबळे यांना जनता शिक्षण संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्य करण्याची संधी संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी दिली होती. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचा हा सन्मान असल्याची भावना संस्थेतील सहकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच संस्थापक किसन वीर व प्रतापराव भोसले यांनी रुजविलेल्या जाती- धर्मापलीकडे पाहणाऱ्या समतेच्या विचारांची परंपरा आजही संस्थेत जोपासली जात असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे केवळ डॉ. कांबळे यांचाच नव्हे, तर जनता शिक्षण संस्थेच्या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनीही डॉ. कांबळे यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page