कोल्हापूर :
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशन आणि वेल्थसिंकच्या संयुक्त विद्यमाने वेल्थ कॉन २०२६ या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे फॉर्च्यून मल्टिप्लेक्स आणि रविवार दि. २ ऑगस्टला सकाळी १० वाजता कोल्हापुरात हॉटेल पॅव्हेलियन येथे हे मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल आणि सचिव मनीष झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, यामध्ये व्यवसायाच्या ‘चांगल्याकडून उत्कृष्टतेकडे’ (good to great) म्हणजे G 2 G जाण्याच्या टप्प्यावर गुंतवणूक कशी करावी या विषयावर
एडलवाईस कंपनीचे अध्यक्ष आणि मँगो टाऊनचे सह संस्थापक अजय शर्मा हे पहिल्या सत्रात मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात मिराए ॲसेट शेरखान येथे रिटेल रिसर्च प्रमुख सोमिल मेहता हे व्यवसायातील ‘अस्थिरतेपलीकडील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
कोल्हापूर देखील उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने झपाट्याने वाढत आहे. त्यात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय समोर उभे राहत आहेत. ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. पारंपारिक गुंतवणुकीकडून लोकांचा कल हा आधुनिक गुंतवणुकीकडे वाढलेला आहे. यामध्येच लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायात गुंतवणूक करण्याकडे लोक वळत आहेत. यामध्ये गुंतवणुक फार महत्त्वाची कामगिरी बजावते. याबद्दल व्यावसायिक तसेच एकल व्यापारी आणि इतरांना देखील याचा फायदा व्हावा याकरिता अशा प्रकारच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष संदीप अथणे, सुरेश पटेल, मनोहर मगन्नेवर, प्रशांत गिरमल, अमोल शहा, मणीलाल कांगटाणी आदी उपस्थित होते.
——————————
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनच्यावतीने ‘वेल्थ कॉन’चे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

