Homeकला - क्रीडा१४ वर्षाखालील लॉन टेनिस स्पर्धेत अदित्य जाधव व समारिया ठाकूर विजेते

१४ वर्षाखालील लॉन टेनिस स्पर्धेत अदित्य जाधव व समारिया ठाकूर विजेते

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित एआयटीए मानांकित १४ वर्षाखालील मुले व मुली चॅम्पियनशीप सिरीज लॉन टेनिस स्पर्धा साठमारी येथील के.एस.ए. टेनिस कॉम्प्लेक्समध्ये उत्साहात पार पडली. स्पर्धेत अदित्य जाधव व समारिया ठाकूर यांनी विजेतेपद पटकावले.
सात दिवस चाललेल्या या नॉकआऊट स्पर्धेत धारवाड, बेंगळुरू, पुणे, सोलापूर, नवी मुंबई, धुळे, बारामती, बीड, सांगली व कोल्हापूर येथील एकूण ७९ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत मुलांचे ४८ तर मुलींचे ३० असे एकूण ७८ सामने खेळविण्यात आले.
मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अदित्य जाधव याने पुण्याच्या रेयांश गुंद याचा ६-०, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. मुली गटात पुण्याच्या समारिया ठाकूर हिने मुंबईच्या अस्मी पित्रे हिला ६-२, ४-६, ६-४ अशा चुरशीच्या सामन्यात हरवून विजेतेपद मिळवले.
डबल्स गटातही कोल्हापूरच्या अदित्य जाधव व हर्षीत मेघानी या जोडीने पुण्याच्या अनय सुमंत व आहान जैन यांना ६-४, ३-६, १०-५ अशा रोमांचक सुपर टायब्रेकरमध्ये पराभूत करत विजेतेपद मिळवले. मुलींच्या डबल्समध्ये समारिया ठाकूर (पुणे) व देविका पिंगे (मुंबई) यांनी द्विजा जैन व अलिया रहीम यांच्यावर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.
स्पर्धेचे टुर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमएसएलटीएचे टुर्नामेंट सुपरवायझर मेहुल केनिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. पंच म्हणून प्रकाश पाटील, वरद घोरपडे, प्रथमेश पाटील, पृथ्वी पुरोहित, ओम पाटील, अथर्व ठकरे आणि श्रेयस चौगुले यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी व टुर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक, जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र दळवी, विश्वंभर मालेकर व दिपक घोडके यांच्या हस्ते झाला. यावेळी एमएसएलटीए सुपरवायझर मेहुल केनिया, सेजल केनिया व पंच प्रकाश पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page