कोल्हापूर :
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या कागल येथील घरासमोर गुढी उभारली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजन करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा! दुष्ट प्रवृत्ती व असुरांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत दाखल झाले. श्री. रामप्रभू अयोध्या नगरीत येताना स्वागत म्हणून अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या होत्या, हा इतिहास आहे. गुढीपाडवा म्हणून हाच मंगलमय पवित्र सोहळा आपण मांगल्याच्या वातावरणात साजरा करतो. या सणाच्या आपणा सर्वांना अंतकरणातून शुभेच्छा.
गुढीपाडवा हा सण प्रत्येक भारतीयाचे व त्यातही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे जणू आनंदपर्वच असते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यश, आरोग्य, समाधान, सौख्य याची गुढी उभारावी, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करून आपणास अनंत शुभेच्छा देत आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी घरासमोर गुढी उभारून केले विधिवत पूजन
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
30.4
°
C
30.4
°
30.4
°
63 %
4.3kmh
48 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

