Homeशैक्षणिक - उद्योग कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये ए स्क्वेअर आरएमसी प्लांटचा शुभारंभ

कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये ए स्क्वेअर आरएमसी प्लांटचा शुभारंभ

कोल्हापूर :
येथील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अल्ट्राटेकच्या ए स्क्वेअर आर.एम.सी. प्लांटचा शुभारंभ झाला. या प्लांटचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
इंडियाज नंबर वन आरएमसी म्हणून अल्ट्राटेकच्या आरएमसी प्रकल्पाला देशासह जगभर मान्यता आहे. या प्रकल्पांतर्गत कागलमध्ये उभारलेला ए स्क्वेअर आरएमसी प्लांट देशातील एक अव्वल प्लांट बनेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या प्लांटमधून ग्राहकांना अपेक्षित रेडिमिक्स काँक्रीटची सेवा, दर्जा आणि गुणवत्ता मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, आजपर्यंत सरकारी इमारती, सार्वजनिक इमारती, घरे अशा अनेक इमारती मी बघितलेल्या आहेत. परंतु कितीही चांगले सिमेंट, वाळू, मटेरियल वापरूनही स्लॅबला गळती का लागतात? हा प्रश्न मला कायम पडून राहिलेला आहे. येथे उपस्थित उद्योजक आणि तज्ज्ञांनी या समस्येवर आवर्जून विचार आणि काम करावे.
यावेळी अल्ट्राटेकचे झोनल हेड छबिलाल पांडे, टेक्निकल झोनल हेड जयेश परमार, रिजनल हेड संजय यादव, बिझनेस डेव्हलपमेंट श्री. पांडिया, धैर्यशील पाटील आदींची मनोगत झाली. प्रकल्पाचे मालक नंदकुमार मिरजकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
3 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page