कोल्हापूर :
शाहिर सिद्दीकने नोंदवलेल्या तीन गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. शाहिर सिद्दीकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच संयुक्त जुना बुधवार पेठने संध्यामठ तरुण मंठळवर ४-० ने एकतर्फी विजय नोंदवला. जुना बुधवारचा खेळाडू शुभम जाधव सामनावीर ठरला. या विजयासह दोन्ही संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. खंडोबा आणि सुभाषनगर यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. १७व्या मिनिटाला डी बाहेरून मारलेल्या जोरदार फटक्यावर पृथ्वीराज साळोखेने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १९व्या मिनिटाला शाहिर सिद्दीकने मैदानी गोल नोंदवून संघाची आघाडी २-० अशी केली. लगेचच २१व्या मिनिटाला रोहित जाधवने दिलेल्या पासवर शाहिर सिद्दीकने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल केला. ३५व्या मिनिटाला रोहित जाधवच्या पासवर प्रभू पोवारने गोल नोंदवून आघाडी ४-० अशी भक्कम केली. त्यानंतर पृथ्वीराज साळोखेने दिलेल्या पासवर रोहित जाधवने गोल करून आघाडी ५-० अशी वाढवली. पूर्वार्धा प्रमाणेच उत्तरार्धात खेळ करत खंडोबाकडून आणखी एका गोलची नोंद झाली. विनायक पाटीलच्या पासवर शाहिरने वैयक्तिक तिसरा तर संघाचा सहावा गोल फलकावर झळकवला. ४६व्या मिनिटानंतर खंडोबाला अनेक गोलच्या संधी आल्या पण दिशाहीन फटाक्यांमुळे त्या वाया गेल्या. सुभाषनगरकडून आर्यन पंधारे, प्रकाश संकपाळ, जावेद जमादार, रोहन चव्हाण यांनी गोलसाठी केलेल्या चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. अखेर उर्वरित वेळेत ६-० ची आघाडी कायम राखत खंडोबाने विजय साकारला.
जुना बुधवार विजयी…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात जुना बुधवारने संध्यामठवर ४-० असा एकतर्फी विजय साकारला. तेजस एस. याने २७ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर शुभम जाधवने ३६ व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी केली. उत्तरार्धात शुभम जाधवने ५६ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. जुना बुधवारकडून झालेल्या एका चढाईत संध्यामठच्या आशिष पाटीलकडून स्वयंगोल झाला. अशाप्रकारे ७६व्या मिनिटाला आघाडी ४-० अशी झाली. संध्यामठकडून गोलची परतफेड करण्यासाठी कपील शिंदे, अभिजीत साळोखे, आदित्य रोटे, पृथ्वीराज साळोखे यांनी जोरदार प्रयत्न केले पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही.
——————————
• सम्राटनगर – मर्दानी आखाडा: दु.१:३० वा.
• वेताळमाळ – बालगोपाल : दुपारी ४ वा.
——————————
खंडोबा आणि जुना बुधवारचे एकतर्फी विजय
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
30.4
°
C
30.4
°
30.4
°
63 %
4.3kmh
48 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

