कोल्हापूर :
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे आणि ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डी. एन. शेलार यांनी केले. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रा. शेलार यांनी त्यांच्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. डॉ. कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांच्या जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांचे जीवन आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे प्रत्येकाने दररोज वाचन करून नवनवीन माहिती, ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी ‘घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा’ या संकल्पनेवर विविध भाषणे व कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासाबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वरूपा सुर्वे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अमन राऊत याने केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
——————————————————-
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

