Homeशैक्षणिक - उद्योग रिझर्व बँकेकडून केडीसीसी बँकेला डायरेक्ट मेंबरशिप

रिझर्व बँकेकडून केडीसीसी बँकेला डायरेक्ट मेंबरशिप

कोल्हापूर :
भारतीय रिझर्व बँकेकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेला डायरेक्ट/थेट मेंबरशिप मिळालेली आहे. रिझर्व बँकेने ही मान्यता आज पत्राद्वारे केडीसीसी बँकेला कळवली.
दरम्यान; रिझर्व बॅंकेकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यानंतर केडीसीसी बँकेला ही मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे केडीसीसी बँकेला स्वतःच्या आय. एफ. एस. सी. कोडसह एन. ई. एफ. टी.,  आर. टी. जी. एस., एन. डी. एस. – ओम व एन. डी. एस. –  कॉल मनी या महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत. तसेच; यापुढे केडीसीसी बँक इतर अर्बन बँकांना सब मेंबरशिप देऊ शकणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, यापूर्वी केडीसीसी बँकेने आयडीबीआय बँकेकडून सब मेंबरशिप घेतली होती. या सब मेंबरशिपच्या माध्यमातून आय. एफ. एस. सी. कोडसह एन. ई. एफ. टी.,  आर. टी. जी. एस. आदी व्यवहार व्हायचेत. तसेच; महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सब मेंबरशिपखाली एन. डी. एस. – ओम ही सुविधा मिळत होती. यापुढे केडीसीसी बँकेच्या स्वतःच्या हक्काच्या या सुविधांमुळे आरटीजीएस व एनईएफटी या सुविधा ग्राहकांना तात्काळ उपलब्ध होवून व्यवहाराच्या रक्कमा तात्काळ जमा होणार आहेत. तसेच; एखाद्या खातेदाराचा प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची रक्कम जमा होत असताना राष्ट्रीयकृत बँकांचा आयएफसी कोड नंबर लागायचा. अशा रकमासुद्धा या नव्या सुविधेमुळे केडीसीसी बँकेच्या ग्राहकांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत.
सर्वच शाखांना मिळणार स्वतंत्र आयएफएससी कोड…
यापूर्वी केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह सर्वच म्हणजे १९१ शाखांसाठी आयएफएससी कोड नंबर एकच होता. यापुढे प्रत्येक शाखेसाठी वेगळा आयएफएससी कोड नंबर असणार आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुलभता आणि गतिमानता येणार आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
heavy intensity rain
27.2 ° C
27.2 °
27.2 °
85 %
13.2kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page