Homeसामाजिकगोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : मुख्यमंत्री

गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : मुख्यमंत्री

• गोकुळ परिवाराकडून एकूण सुमारे ३१ लाख रुपयांची पूरग्रस्त भागासाठी मदत
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ संघ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर समाजाभिमुख दृष्टिकोनातूनही आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी संघटनेतर्फे (आयटक) सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मुंबईत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम व लक्ष्मण पाटील, कृष्णात चौगुले यांनी मंगळवारी हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी गोकुळ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
80 %
1.9kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page