Homeशैक्षणिक - उद्योग 'श्री दत्त शिरोळ'ला सर्वोत्तम ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान

‘श्री दत्त शिरोळ’ला सर्वोत्तम ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान

कोल्हापूर  :
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांच्यावतीने शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सन २०२४-२५ या हंगामासाठी उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या नवी दिल्ली येथे आयोजित वार्षिक समारंभात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उद्यान पंडित गणपतराव पाटील व चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्वीकारला.
श्री दत्त कारखान्याच्या सन २०२४-२५ चा हंगाम आव्हानात्मक असतानाही कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. कारखान्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे भारत सरकारच्या मुख्य संचालकांच्या(साखर) अध्यक्षतेखाली तज्ञांच्या पुरस्कार निवड समितीने कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ चे निकाल निश्चित केले होते. त्यामध्ये श्री दत्त साखर कारखान्यास उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुण कुमार देसाई, इंद्रजीत पाटील, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ॲड. प्रमोद पाटील, महेंद्र बागे, ज्योतीकुमार पाटील, सुरेश कांबळे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मिस्त्री, कार्यकारी संचालक संजीव देसाई, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.1 ° C
28.1 °
28.1 °
82 %
3kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page