Homeशैक्षणिक - उद्योग वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी.वाय. पाटील विद्यापीठाला भेट

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी.वाय. पाटील विद्यापीठाला भेट

कोल्हापूर :
द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यु.डब्ल्यु.ए.) चे कुलगुरू व अध्यक्ष प्रा. अमित चकमा यांनी डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चरल अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे सदिच्छा भेट दिली.
डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि यु.डब्ल्यु.ए. यांच्यातील भविष्यातील शैक्षणिक, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक देवाणघेवाण, विद्यार्थी देवाणघेवाण, सेमिस्टर एक्स्चेंज, दुहेरी पदवी अभ्यासक्रम तसेच आंतरराष्ट्रीय इमर्शन कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांवर विचारविनिमय झाला.
यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता म्हणाले, दोन्ही विद्यापीठातील  सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्यांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ही भागीदारी अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
यु.डब्ल्यु.ए. चे कुलगुरू प्रा. अमित चकमा म्हणाले, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ सोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास आम्हाला आनंद आहे. दोन्ही विद्यापीठांच्या सामर्थ्यांचा उपयोग करून विद्यार्थी व संशोधकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासोबतच संयुक्त संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्यावर आमचा भर राहील.
या सहकार्याच्या माध्यमातून तळसंदे विद्यापीठामधील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकासाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक विद्यापीठांमध्ये अध्ययन व संशोधनाचा अनुभव मिळावा आणि दोन्ही विद्यापीठांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाची देवाणघेवाण अधिक व्यापक व्हावी, यावर भर देण्यात आला. यासाठी आंतरविद्याशाखीय अध्ययन संचालक डॉ. योगेश चिमटे व आंतरराष्ट्रीय संबंध व व्यवहार, समन्वयक डॉ. सनी मोहिते यांनी मेहनत घेतली.
यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, अधिष्ठाता (अकॅडमिक्स) डॉ. संग्राम पाटील, अधिष्ठाता (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी) डॉ. वाय. एम. पाटील, अधिष्ठाता (स्कूल ऑफ मॅनेजमेंट) डॉ. मुरलीमोहन भूपती तसेच वित्त अधिकारी सुजित सरनाईक उपस्थित होते.
या  उपक्रमास विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि प्र-कुलपती ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.1 ° C
28.1 °
28.1 °
82 %
3kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page