कोल्हापूर :
एमएसएलटीए मानांकित दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत श्लोक अलंद व रुदवी लिमकर हे विजेते ठरले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन च्यावतीने मानांकित सुहाना १० वर्षाखालील लॉन टेनिस स्पर्धा साठमारी येतील टेनिस कॉम्प्लेक्सवर संपन्न झाली. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई पुणे, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, सांगली येथील ३० खेळाडूंचा समावेश होता. त्यामध्ये २० मुले व १० मुली यांनी सहभाग नोंदवला होता. मुलांचे १९ सामने तर मुलींचे ९ सामने असे एकूण २८ सामने खेळण्यात आले.
अंतिम लढतीत मुलींच्या गटात हृदवी लिमकरने ऐरणी शेखचा ४-०, ४-१ने पराभव केला व विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात श्लोक अलंदने पलाश रूचंदानीचा ४-०, ४-० असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ के.एस.ए.चे जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मेहुल केनिया, सेजल केनिया व पालक उपस्थित होते.
दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत श्लोक अलंद व रुदवी लिमकर विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

