HomeUncategorizedश्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

• पूरग्रस्त १० तालुक्यांसाठी १० ट्रकमधून  जीवनावश्यक वस्तू रवाना
कोल्हापूर :
मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरोळ तालुक्यातून विविध गावातून मदत गोळा करण्यात आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूसहित रोख रकमेच्या स्वरूपातसुद्धा विविध संस्थांनी मदत केली. १० पूरग्रस्त तालुक्यांसाठी १० ट्रकमधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गणपतराव पाटील, श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील आदींच्या उपस्थितीत या गाड्या पाठवण्यात आल्या.
गेल्या महिन्याभरापासून राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाऊंडेशन व श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत गोळा करण्यात आली.
श्री दत्त साखर कारखान्याच्या सर्व कामगारांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून आपला एक दिवसाचा पगार सुमारे १० लाख रुपयांची मदत दिली.
शिरोळ तालुक्यामधून पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या साहित्यामध्ये तांदूळ ३१ टन, ज्वारी ५ टन ९३० किलो, गहू ११ टन ७३५ किलो, तेल १००० लिटर, साखर ५ टन ८०० किलो, आटा पीठ १ टन १५० किलो, पाणी बॉटल्स ३५० बॉक्स, चादर व ब्लँकेट २१०० नग, यासह इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या. या साहित्याचे ७८०० किट्स बनवण्यात आले. एकूण १० तालुक्यांसाठी १० ट्रकमधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या.
परंड, भूम (जिल्हा धाराशिव), कण्हेरवाडी व केळेवाडी (तालुका वाशी, जिल्हा धाराशिव), नळदुर्ग (जिल्हा धाराशिव), पाटोदा (जिल्हा बीड), शिरूर कासार (जिल्हा बीड), गेवराई (जिल्हा बीड), करमाळा (जिल्हा सोलापूर), मोहोळ (जिल्हा सोलापूर) व नांदेड येथील पूरग्रस्तांच्यासाठी साहित्य पाठवले. यावेळी कारखाना सर्व संचालक मंडळ, खातेप्रमुख यांच्यासह विविध मान्यवर तसेच सा. रे. पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
51 %
3.6kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page