Homeराजकियभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट

भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट

• महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणून
कोल्हापूर :
नवी दिल्लीतील महाविद्यालयीन निवडणुका अत्यंत चुरशीने होतात. बहुतांश विद्यापीठातील विद्यार्थी संघटना अत्यंत सक्रिय आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच दिल्ली विद्यापीठाला भेट दिली. तिथल्या निवडणुकांची पद्धत आणि युवक संघटनांच्या कामकाजाविषयी त्यांनी माहिती घेतली. त्यातून महाविद्यालयीन पातळीवर नेतृत्व करणार्‍या आर्यमान यांच्याशी कृष्णराज महाडिक यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच दिल्ली विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या प्रांगणात असलेल्या श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला अभिवादन करून विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. विशेषतः विद्यापीठ युनियनचे लीडर आर्यमान यांची कृष्णराज यांनी भेट घेतली.
नवी दिल्लीतील महाविद्यालयीन निवडणुकांची कार्यपध्दती, विद्यार्थी संघटनांना असलेले अधिकार आणि त्यांची उद्दीष्ट, महाविद्यालयातील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण याबद्दल कृष्णराज महाडिक यांनी माहिती घेतली. त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. देशभरातून युवापिढीचे प्रश्न आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी ही भेट महत्वाची ठरल्याचे कृष्णराज महाडिक म्हणाले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2 ° C
31.2 °
31.2 °
62 %
5kmh
1 %
Mon
31 °
Tue
32 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page