HomeUncategorizedपरिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोनातूनच यश मिळते : रवींद्र येवले

परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोनातूनच यश मिळते : रवींद्र येवले

कोल्हापूर :
यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोन यांवर आधारित असते. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कौशल्यविकासासोबत नैतिक मूल्ये जोपासली पाहिजेत, असे प्रतिपादन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी संस्थेचे खजिनदार नारायण चौधरी, संचालक केशवराव पाडळे, सुरेशराव यादव, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, कार्याध्यक्ष व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे तसेच क्रीडा संचालक व एन.सी.सी. अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. येवले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत हाती घेणे गरजेचे आहे. आपल्या क्षमतांची ओळख झाली तर यश निश्चित मिळते. विचारांचे प्रदूषण राष्ट्राला नाहीसे करते. विद्यार्थ्यांनी टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी आई-वडील व आपल्या शिक्षकांचा आदर करायला हवा. जे खरे असते त्याला कधीच जाहिरात करावी लागत नाही. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला यश मिळते. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. स्वतःला कमी समजू नका.
अध्यक्षीय भाषणात मदनदादा भोसले म्हणाले, तरुण पिढीने नेहमी सजग आणि जागरूक राहिले पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक यश पुरेसे नसून, शिक्षणासोबत एखादे कौशल्य आत्मसात केले आहे का, यालाही तितकेच महत्त्व दिले जाते. आज पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजासाठी मोलाचे योगदान देणारे, कर्तव्यदक्ष व जबाबदार नागरिक बनावे, हीच अपेक्षा आहे.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला.
शैक्षणिक अहवाल वाचन प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी केले. क्रीडा व एनसीसी अहवाल वाचन मेजर डॉ. समीर पवार यांनी केले. एनएसएसचा अहवाल डॉ. मंजुषा इंगवले यांनी तर कला व सांस्कृतिक अहवाल प्रा. डॉ. अंबादास सकट यांनी केले. सर्व पारितोषिकांचे वाचन डॉ. संग्राम थोरात यांनी केले.
या कार्यक्रमात एमएस्सी रसायनशास्त्र शाखेचा विद्यार्थी मृगेंद्र तानाजी गुरव व बीसीए विभागाची सानिया अश्फाक काझी यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्राध्यापकांचा देखील गौरव करण्यात आला. पाहुण्यांची ओळख डॉ.शिवाजी कांबळे यांनी केली.आभार प्रा. डॉ. विनोद वीर यांनी मानले. भक्ती वायदंडे हिने पसायनदान गायन केले. सूत्रसंचालन प्रा. सुमती कांबळे व प्रा. राहुल तायडे यांनी केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
83 %
9.2kmh
99 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page