HomeUncategorizedपोदार इंटरनॅशनल स्कूल येथे कला प्रदर्शन उत्साहात

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे कला प्रदर्शन उत्साहात

कोल्हापूर :
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले “Art Shapes the Future – How Creative Skills Build Tomorrow’s Careers” या संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलात्मक प्रकल्पांनी उपस्थित पालक व पाहुण्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. १४ फेब्रुवारी रोजी शाळेच्या परिसरात आयोजित या कला प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कल्पकता, सर्जनशीलता आणि भविष्यकालीन करिअरविषयीची जाणीव यांचा उत्कृष्ट संगम सादर केला.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती व शोधवृत्तीवर आधारित आकर्षक प्रकल्प मांडले, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास, समस्या निराकरण आणि करिअरपूर्व विचारसरणीवर आधारित संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून त्यांच्या कलात्मक प्रगतीचा तसेच शाळेतील कला अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेचा अनुभव पालकांना घेता आला. कला हा केवळ अभ्यासाचा विषय नसून भविष्यातील सर्जनशील करिअरसाठी मजबूत पाया ठरतो, हा संदेश या प्रदर्शनातून प्रभावीपणे देण्यात आला.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा कपूर तसेच उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा अंब्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
83 %
9.2kmh
99 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page