कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाअंतर्गत आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या बाजार विकास व प्रोत्साहन या घटकाअंतर्गत शेतकरी अभ्यासदौरे व प्रक्षेत्र भेटी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, कोल्हापूर यांच्यामार्फत दि. १० ते १२ मार्च २०२६ या कालावधीत शेतकरी अभ्यासदौरा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
हा अभ्यासदौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. अभ्यासदौऱ्यात एकूण ३२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये ८ महिला व २४ पुरुष होते. अभ्यास दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्ञ अनिल जाधव आणि सत्यजित भोसले यांची अभ्यास दौरा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कोल्हापूर विभागातील शेतकर्यांना शेतमाल प्रक्रिया आणि ब्रँडिंग बाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला होता.
अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वेंकटेश ॲग्रो प्रो.कं.लि., फलटण, के.बी. एक्सपोर्ट, फलटण तसेच पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक संस्था, सासवड या प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यात संधी व मूल्यवर्धन याबाबत माहिती घेतली.
अभ्यासदौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राला भेट देण्यात आली. यामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्र, विकिरण सुविधा केंद्र तसेच व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अपेडा, वाशी या संस्थेला भेट देऊन कृषी निर्यात प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अभ्यासदौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन व संशोधन कार्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
हा शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पार पडला आहे. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यात सुविधा व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारासाठी नवीन दिशा मिळणार असल्याचा विश्वास डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.
मॅग्नेट प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौऱ्यात ३२ शेतकऱ्यांचा सहभाग
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.5
°
C
28.5
°
28.5
°
66 %
2.7kmh
29 %
Mon
30
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
31
°
Fri
32
°

