Homeशैक्षणिक - उद्योग 'गोकुळ आईस्क्रीम'चा शुभारंभ

‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ

• ‘गोकुळचा’ ६३वा वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संंघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या ६३व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ‘गोकुळ श्री’ पुरस्कारासह विविध बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संंघ (गोकुळ)ने गेल्या काही वर्षांमध्ये दुधाबरोबरच अनेक गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थ बाजारात आणले आहेत. यामध्ये फ्लेवर्ड मिल्क, बासुंदी, श्रीखंड, चीज, गुलाबजामून, पेढा, दही, ताक, लस्सी या सर्व उत्पादनांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक दिवसांपासून वितरक व ग्राहकांकडून गोकुळ आईस्क्रीम सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार गोकुळ दूध संघाच्या ६३व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ करण्यात आला. या आईस्क्रीममध्ये म्हैस दूध, स्किम मिल्क पावडर, म्हैस लोणी व गाय किस व नॅचरल फ्लेवर वापरण्यात आले आहेत. तसेच मँगो, नॅचरल व्हेनीला, बेल्जीयन चॉकलेट, बटर स्कॉच, अफगाण ड्रायफ्रुट अशा विविध प्रकारात आईस्क्रीम उपलब्ध आहे.
मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे व संचालक मंडळ आणि प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ करण्यात आला. एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘गोकुळ श्री’ पुरस्कार व विविध बक्षीस वितरण उत्साहात पार पडले. तसेच यावेळी कोल्हापूर, पुणे व मुंबई येथील जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दूध वितरकांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केक कापून ६३वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्‍वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वासराव पाटील यांनी केले तर प्रास्‍ताविक ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच आभार संचालक शशिकांत पाटील- चुयेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला माजी आम. के. पी. पाटील, माजी आम.राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, संचालिका सौ. स्मिता गवळी, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वितरक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.8 ° C
27.8 °
27.8 °
82 %
9.2kmh
99 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page