कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांची व प्रलंबित विषयांची माहिती दिली.
याप्रसंगी गोकुळ दूध संघाच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प, स्लरी प्रकल्प, वासरू संगोपन योजना, मुंबई, पुणे डेअरी विस्तार तसेच मुंबई येथील प्रलंबित भूखंडासंदर्भातील विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच यावेळी दुग्ध विकास मंत्री यांना गोकुळ भेटीचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तेच्या माध्यमातून गोकुळने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला असून हा विश्वास कायम राखून संस्था अधिक ग्राहकाभिमुख व्हावी आणि बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करावे.
दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आपली सांगितले की, दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गोकुळसारख्या नामांकित संस्थेला प्रलंबित विषयांवर शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते
गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांनी घेतली एकनाथ शिंदे
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.7
°
C
29.7
°
29.7
°
71 %
3.8kmh
100 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

