कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे पीएम-ई बससेवेद्वारे एकूण १०० बसेस दाखल होणार असून, त्यापैकी दाखल झालेल्या ४० बसेस शहरातील तसेच शहरालगतच्या विविध मार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी मैदान – आर. के. नगर – राजारामपुरी – शुगर मिल या मार्गावर ८ बसेस तसेच राजोपाध्येनगर ते मुडशिंगी या मार्गावर १ बस अशा एकूण ९ बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाचगाव ते कदमवाडी या मार्गावर ८ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत.
यानंतर शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ पासून बोंद्रे नगर – गंगावेश – स्टँड – तावडे हॉटेल मार्गे कागल या मार्गावर पीएम-ई बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कळंबा – स्टँड – तावडे हॉटेल – शिरोली मार्गे पेठ वडगाव या मार्गावरही पीएम-ई बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
पीएम-ई बससेवेत दाखल झालेल्या नव्या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित (एसी) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना जुन्याच तिकीट दरात अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूर शहरातील नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत विविध मार्गांवर पीएम-ई बसेस सुरू करण्यात येत आहेत. तरी प्रवासी नागरिकांनी या आधुनिक पीएम-ई बससेवेचा जास्तीत जास्त वापर करून कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन केएमटी प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पीएम-ई बससेवेच्या नव्या बसेस विविध मार्गांवर टप्प्याटप्प्याने धावणार
Mumbai
clear sky
28.3
°
C
28.3
°
28.3
°
69 %
2.5kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
30
°

