Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्ड

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्ड

कोल्हापूर :
शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी – २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागास ‘बेस्ट परफॉर्मिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. यावेळी एड्युस्किल्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शुभजित जगदेव प्रमुख उपस्थित होते.
एड्युस्किल्स फाउंडेशन हे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षण, व्हर्च्युअल इंटर्नशिप, सर्टिफिकेशन तसेच प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणारे व्यासपीठ आहे. एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह देशभरातील शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होतात. कौशल्याधारित शिक्षण, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणाऱ्या संस्थात्मक उपक्रमांचा या माध्यमातून गौरव केला जातो.
विद्यापीठाला मिळालेल्या या दोन्ही पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.3 ° C
28.3 °
28.3 °
69 %
2.5kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page