• दिल्ली गोल्फ क्लबवर १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रंगणार स्पर्धा
कोल्हापूर :
भारताचा गोल्फपटू शुभंकर शर्मा डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा दिल्ली गोल्फ क्लबमध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे याच ऐतिहासिक गोल्फ कोर्सवर शुभंकरने बालपणी खेळाचे बारकावे शिकले, अनेक आठवणी जपल्या आणि मोठ्या मंचावर खेळण्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळे त्याच्यासाठी हा भावनिक क्षण असणार आहे.
सुमारे ४० लाख डॉलर बक्षीस (सुमारे ३८ कोटी ७१ लाख रुपये) रक्कम असलेल्या या स्पर्धेत शुभंकर भारतातील एका प्रस्थापित आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात पुनरागमन करत आहे. या स्पर्धेत तो यंदाच्या वर्षामधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळताना दिसेल. त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
शुभंकर म्हणाला की, मी दिल्ली गोल्फ क्लबमधील जागतिक गोल्फ स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे. हे माझ्यासाठीच नाही, तर सर्व भारतीय खेळाडूंसाठी एक अत्यंत खास ठिकाण आहे. मागील वर्षी अनेक अव्वल खेळाडू इथे आले होते आणि त्यांना हा अनुभव खूप आवडला होता. आता इतर खेळाडूंमध्येही या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अनेक खेळाडू आणि कॅडीजच्या मते दिल्ली गोल्फ कोर्स हा त्यांच्या संपूर्ण वर्षातील सर्वोत्तम कोर्सपैकी एक आहे; कारण या कोर्सला असलेला इतिहास आणि त्याची पारंपरिक शैली गोल्फपटूंसाठी खूप महत्त्वाची असते.
तो पुढे म्हणाला, की एकाच वर्षात ही स्पर्धा टूरवरील सर्वांत मोठ्या स्पर्धांपैकी एक बनली आहे. या वर्षातील चारपैकी तीन मेजर विजेत्यांसह जगातील अनेक दिग्गज खेळाडू यात सहभागी होत आहेत. त्यामुळे हा एक ब्लॉकबस्टर सोहळा असणार आहे.
२०२५ आणि २०२६ मध्ये लागोपाठ ‘मास्टर्स’ जिंकणारा रॉरी मॅकलरॉय या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्यासोबत अरॉन राय आणि रायन फॉक्सदेखील खेळणार आहेत. याचा अर्थ मास्टर्स, पीजीए चॅम्पियनशिप आणि ओपन चॅम्पियन्सचे विजेते दिल्लीत प्रत्यक्ष खेळताना दिसतील. याशिवाय या स्पर्धेचा गतविजेता टॉमी फ्लीटवुडदेखील मैदानात उतरेल. त्यांच्यासोबत मास्टर्स विजेता पॅट्रिक रीड, माजी यूएस ओपन विजेता जस्टिन रोज आणि ओपन विजेता शेन लोरी यांसारखे दिग्गज खेळाडूही खेळताना दिसतील.
या सर्वांमध्ये भारताचा शुभंकर शर्मा एक असेल. अर्थात, त्याला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असेल. त्याचे घरचे मैदान असल्याने निश्चित फायदा त्याला होईल.
——————————
डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपमध्ये फॉर्मात परतण्यासाठी भारतीय गोल्फपटू शुभंकर शर्मा उत्सुक
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.9
°
C
28.9
°
28.9
°
68 %
2.2kmh
0 %
Thu
29
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°

