Homeराजकियभाजपा कोल्हापूरच्यावतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

भाजपा कोल्हापूरच्यावतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

कोल्हापूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशसेवेला दिलेल्या २५ वर्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर च्यावतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात संपन्न झाली. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
दसरा चौक येथून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड, महावीर गार्डन, खानविलकर पेट्रोल पंप मार्गे ही यात्रा भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे पोहोचली.
भाजपा जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेवर आधारित आकर्षक ‘सेवा ज्योती’ रांगोळी साकारण्यात आली होती. वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताच्या सामुहिक गायनानंतर उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संबोधन मोठ्या स्क्रीनवर ऐकले.
भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थितांना संबोधन केले. पक्षाचे आगामी संघटनात्मक कार्यक्रम बूथ स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वेळ देऊन मतदारांशी संपर्क वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रेडेकर (छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेता), वैष्णवी पवार (राष्ट्रीय खो-खो सुवर्णपदक विजेती) आणि वृंदा भुतडा (राष्ट्रीय योग सुवर्णपदक विजेती) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, अमर साठे, माधुरी नकाते, अनिल डाळ्या, सतीश पंडित, आनंद गुरव, सुशीला पाटील, शाहजी भोसले, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विजयसिंह देसाई, सुनील वाडकर, निलिमा शैलेश पाटील, पल्लवी देसाई, दीपा काटकर, अर्चना कोराणे, पूर्वा राणे, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, मामा कोळवणकर, दिलीप मेत्राणी, दिलीप बोंद्रे, मंगला निपाणीकर, निलेश देसाई, विजय आगरवाल, शिवाजी बुवा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.3 ° C
28.3 °
28.3 °
69 %
2.5kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page