• दरमहा 14GB डेटा आणि अनलिमिटेड HD कॉलिंगची सुविधाही मिळणार
कोल्हापूर :
जिओने आपल्या 10व्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर केलेल्या ऑफरअंतर्गत ‘जिओभारत 4G’ फोन ₹1,499 मध्ये उपलब्ध करून दिला असून, त्यासोबत 6 महिन्यांचे रिचार्ज मोफत दिले जाणार आहे. या कालावधीत ग्राहकांना दरमहा 14GB डेटा आणि अनलिमिटेड HD व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. म्हणजेच फोन खरेदी केल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या रिचार्जची चिंता ग्राहकांना करावी लागणार नाही. रिचार्जसाठी वेगळे पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही.
कंपनीने ही ऑफर विशेषतः अद्याप 2G फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन सादर केली आहे. जिओच्या माहितीनुसार, असे ग्राहक साधारणपणे दरमहा सुमारे ₹199 रिचार्जवर खर्च करतात. सहा महिन्यांचा हा खर्च सुमारे ₹1,200 इतका होतो. त्यामुळे ₹1,499 मध्ये फोन आणि सहा महिन्यांचे रिचार्ज दोन्ही मिळत असल्याने 2G वरून 4G वर जाण्यासाठीचा अतिरिक्त खर्च प्रत्यक्षात केवळ ₹299 इतकाच राहतो. मात्र, फोन खरेदी करताना ग्राहकांना संपूर्ण ₹1,499 रक्कम अदा करावी लागेल.
2G वरून 4G वर आल्यानंतर ग्राहकांना अल्ट्रा-फास्ट इंटरनेटचा लाभ तर मिळेलच, शिवाय ‘जिओभारत’वर जिओटीव्हीचे 500 हून अधिक टीव्ही चॅनेल्स, जिओहॉटस्टारवर क्रिकेट, चित्रपट आणि मनोरंजनाची सुविधा, म्युझिक तसेच जिओपेच्या माध्यमातून यूपीआय (UPI) पेमेंटसारख्या सुविधांचाही लाभ घेता येईल.
या फोनमध्ये 2.4 इंचांचा डिस्प्ले आणि 2000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही ऑफर ‘जिओभारत’च्या निवडक A1, B1, B2 आणि B3 मॉडेल्सवर लागू आहे.
——————————
1,499 च्या ‘जिओभारत 4G’ फोनसोबत 6 महिन्यांचे रिचार्ज मोफत
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

