Homeकला - क्रीडाक्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद  

क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद  

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने मेरी वेदर मैदान येथे घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने कॉमर्स कॉलेजवर १७ धावांनी विजय संपादन केला. या विजयासह विवेकानंद कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.
उपांत्यपूर्व सामना विवेकानंद कॉलेज विरुद्ध डी.वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज संघात झाला. यामध्ये ‘विवेकानंद’च्या अर्थव शेळकेने शालेय क्रिकेट स्पर्धेमधील २८ चेंडूत नाबाद ११५ धावा करून रेकॉर्ड केले. विवेकानंद कॉलेज संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
————
विजेता संघ असा : अथर्व शेळके (कर्णधार), हर्षद कुंभोजे, शिवजीत इंदुलकर, वेदांत पाटील, राजवर्धन मोरे, रणवीर पाटील, मयंक राठोड, प्रेम चौगले, पृथ्वेश जाधव, नीलमेघ नागावकर, धैर्यशील पाटील, ओम पाटील, ईशान देवणे, आदर्श रावळ, अथर्व ओतारी, राजदिप मंडलिक तर प्रशिक्षक प्रा. साद मुजावर, प्रा. संतोष कुंडले हे आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
63 %
3.5kmh
22 %
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page