कोल्हापूर :
विवेकानंद ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्यावतीने ‘नशामुक्त युवा – विकसीत भारत’ या शासकीय उपक्रमांतर्गत ‘नशा मुक्ती व स्वाक्षरी अभियानाचे’ आयोजन आले होते. सशक्त, निरोगी आणि व्यसनमुक्त तरुण पिढीची निर्मिती करून देशाच्या विकासाला गती देणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील व प्रा. एच. जी. पाटील यांनी या अभियानाचे मुख्य संयोजन केले आणि उपस्थित स्वयंसेवकांना सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली. कार्यक्रमादरम्यान तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला. नशामुक्त युवकच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, हा संदेश यावेळी देण्यात आला.
व्यसनाविरोधातील लढ्याला पाठिंबा देण्यासाठी एक विशेष ‘स्वाक्षरी फलक’ तयार करण्यात आला होता. या फलकावर प्राचार्य, प्राध्यापक, तसेच सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांनी स्वाक्षरी करून नशामुक्त राष्ट्र निर्मितीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्रशासकीय सेवा उत्कृष्टरित्या पूर्ण करून सेवा निवृत्त झालेबद्दल सदानंद दुर्गुळे यांचा एनएसएस विभागामार्फत विशेष सत्कार करण्यात आला.
या उपक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. पी. एस. बागडे, डॉ. बी. टी. दांगट, पी. वाय. राठोड, डॉ. एच. पी. पाटील, सौ. एम. पी. गवळी, सौ. ए. पी. पाटील, सौ. एस. एन. माने, सौ. पी. यू. पाटील, सदानंद दुर्गुळे, शिक्षक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी केले तर एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. जी. पाटील यांनी आभार मानले. तरुणांनी घेतलेल्या नशामुक्तीच्या संकल्पनाने आणि राष्ट्रगीताने या यशस्वी अभियानाची सांगता झाली.
——————————
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नशामुक्त युवा – विकसीत भारत’ उपक्रम साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
81 %
2.5kmh
42 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
31
°
Sun
30
°
Mon
29
°

