Homeइतररस्त्यावरील गणोत्सवाचे मंडप तातडीने काढण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

रस्त्यावरील गणोत्सवाचे मंडप तातडीने काढण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

कोल्हापूर :
सार्वजनिक गणेशोत्सव संपल्यानंतरही शहरातील रस्त्यांवर असलेले गणेश मंडप तातडीने काढून घेण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त व उपशहर अभियंत्यांनी आपल्या विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आजच पाहणी करावी. संबंधित गणेश मंडळांना मंडप काढून घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे. आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विभागीय कार्यालय स्तरावर घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा साप्ताहिक आढावा नियंत्रण अधिकारी व सहाय्यक आयुक्तांनी घ्यावा. तसेच सामान्य प्रशासन व रावका विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रकरणांची संख्या, त्यापैकी प्रलंबित प्रकरणे आणि निकाली काढलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा सादर करण्याच्या सूचना दिल्या.
पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आल्या. केएमटीच्या गाड्यांचे डॅशबोर्ड, ट्रायल, कंडक्टर तसेच मार्ग निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांना देण्यात आले. नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलसाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
आचारसंहिता लागू असल्याने ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या कामांची स्क्रुटिनी तसेच मंजुरीपूर्वीची आवश्यक कार्यवाही आचारसंहिता कालावधीतच पूर्ण करून घ्यावी. आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित कामांना अंतिम मंजुरी देऊन मंजूर कामांच्या वर्कऑर्डर तातडीने देण्यात येतील, असे आयुक्त डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त व शहर अभियंता यांनी विभागीय कार्यालय स्तरावर प्रलंबित तसेच अर्धवट असलेल्या कामांचा आढावा घ्यावा. पावसाळा संपल्याने ज्या कामांना वर्कऑर्डर देण्यात आली आहे, ती कामे कोणतीही दिरंगाई न करता तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या रजेचे अधिकार यापुढे संबंधित सहाय्यक आयुक्तांकडे राहतील. तसेच बायोमेट्रिक कार्डधारक कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय कार्यालय स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या सर्व मीटरचे रीडिंग लोडच्या ७५ टक्के प्रमाणात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मीटरनिहाय रीडिंग घेण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्युत अभियंता यांना देण्यात आल्या.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याच्या दृष्टीने नाट्यगृहाच्या देखभालीसाठीची एजन्सी आजच निश्चित करावी. तसेच नाट्यगृहाच्या बाहेरील प्रलंबित कामे दि. ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहर अभियंत्यांना दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पद्मल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह राजपूत, रावका अधिकारी सुनील बिद्रे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
76 %
3.5kmh
5 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page