• काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकारशाही कारभाराविरोधात आणि विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या नावाखाली होणाऱ्या कथित मतचोरी विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत मुख्य निवडणूक आयुक्तांचा निषेध केला. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
कॉग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. निवडणुका या स्वतंत्र व निष्पक्षपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. स्वायत्त असलेला निवडणूक आयोग मागील काही वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत असल्याचा आतापर्यंत संशय होता पण निवडणूक आयोगातील अभूतपूर्व मतभेद उघड झाल्याने निवडणूक आयोगात सावळा गोंधळ आहे, त्यांचा कारभार पारदर्शक नाही हे उघड झाले आहे. एसआयआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे काढली जात आहेत हे लोकशाही अत्यंत घातक आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी सांगितल्याची बातमी एका दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. गेल्या १० महिन्यांत वरील दोन निवडणूक आयुक्तांनी किमान १४ वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर अधिकृतपणे आक्षेप नोंदवले आहेत. ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (एसआयआर) प्रक्रियेबाबत, नवीन मतदारांची अनधिकृतपणे केलेली नोंदणी, नावे वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीचे केलेले केंद्रीकरण यांचा यात समावेश होता मुख्य निवडणूक आयुक्त यांनी हे निर्णय दोन्ही सहकाऱ्यांना अंधारात ठेवून घेतले. हे निर्णय हुकूमशाही पद्धतीचे आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृती देशद्रोहाची आहे, त्यांनी लोकशाही व संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, लोकशाहीची हत्या केली आहे. देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी देशद्रोही ज्ञानेशकुमार यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून अटक करणे गरजेचे आहे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
या निवेदनावर आमदार सतेज डी. पाटील, कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण केसरकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जि.प. गटनेता एकनाथ पाटील, कोल्हापूर महानगरपालिका गटनेता इंद्रजित बोंद्रे, महापालिका विरोधी पक्षनेता
राजू लाटकर यांच्यासह शशांक बावचकर, वैशाली महाडिक, भारती पोवार, विनायक घोरपडे, संजय पोवार-वाईकर, उदय पोवार, अक्षय शेळके आदींच्या सह्या आहेत.
——————————
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
Mumbai
clear sky
27.9
°
C
27.9
°
27.9
°
76 %
3.5kmh
5 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
30
°

