Homeराजकियशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ

कोल्हापूर :
अमाप उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादाच्या वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक मतदारांच्या उपस्थितीत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळी हा शुभारंभ पार पडला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी कौस्तुभ गावडे यांच्या शिक्षकहिताच्या भूमिकेला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रृती जोशी, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. कविता तिवडे, डॉ. आर. वाय. पाटील, हितेंद्र साळुंखे, महेश साळुंखे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व नेते, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय व कार्यालयीन कर्मचारी तसेच महिला शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शिक्षक मतदारांच्या नोंदणीचे नियोजन, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी असलेला थेट संपर्क आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेले काम यामुळे कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा विश्वास व पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद, शिक्षकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याची भूमिका या प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने कोल्हापुरात शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.2 ° C
27.2 °
27.2 °
76 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page