• १४ तास २१ मिनिटे ५८ सेकंदांत तिसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’
कोल्हापूर :
भारतीय ट्रायथलीट आणि क्रीडा आयोजक वैभव बेळगावकर यांनी इटली येथे पार पडलेली अत्यंत आव्हानात्मक आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा १४ तास २१ मिनिटे ५८ सेकंदांत यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याची वैभव बेळगावकर यांची ही तिसरी वेळ आहे.
आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण सहनशक्तीच्या क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत खेळाडूला ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, असे एकूण २२६ किलोमीटर अंतर सलग पूर्ण करावे लागते. संपूर्ण स्पर्धा निर्धारित १६ तासांच्या कट-ऑफमध्ये पूर्ण करावी लागत असल्याने यासाठी अनेक वर्षांचा सराव, शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता, योग्य आहार आणि शिस्तबद्ध नियोजन आवश्यक असते.
इटलीतील या स्पर्धेत जगभरातून सुमारे ५,००० खेळाडूंनी सहभाग घेतला. बेळगावकर यांनी भूमध्य समुद्रातील ३.८ किलोमीटर पोहण्याने स्पर्धेला सुरुवात केली. त्यानंतर १८० किलोमीटर सायकलिंग आणि अखेरीस ४२.२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करत त्यांनी फिनिश लाईन गाठली.
वैभव बेळगावकर यांनी यापूर्वी २०१५ मध्ये आयर्नमॅन मलेशिया आणि २०१९ मध्ये आयर्नमॅन ऑस्ट्रिया पूर्ण केली होती. आता २०२६ मध्ये आयर्नमॅन इटली पूर्ण करून त्यांनी आपल्या कारकिर्दीतील तिसरे आयर्नमॅन फिनिश आपल्या नावावर केले आहे.
या संपूर्ण क्रीडा प्रवासात आणि तयारीमध्ये वैभव बेळगावकर यांना उदय पाटील, निलय मुधाळे, वरद पाटील आणि मनीष सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य आणि पाठबळ लाभले.
——————————
वैभव बेळगावकर यांची आयर्नमॅन इटली स्पर्धेत दमदार कामगिरी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.2
°
C
27.2
°
27.2
°
76 %
1.2kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°

