Homeशैक्षणिक - उद्योग कृषी संशोधनाच्या नव्या क्षितिजांकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी : प्रा. डी. एन. शेलार

कृषी संशोधनाच्या नव्या क्षितिजांकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी : प्रा. डी. एन. शेलार

• डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच मानवी जीवनाचा महत्त्वपूर्ण आधार आहे. संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात प्रा. शेलार बोलत होते.
नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रा. डी. एन. शेलार यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, उपलब्ध शैक्षणिक संधी, विविध उपक्रम आणि माजी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे डीवायएसपी, पोलीस उपनिरीक्षक, कृषी उपसंचालक तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी म्हणून निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षांमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी कौतुक केले.
प्रा. शेलार म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाला भविष्यात मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणाकडे केवळ पदवी संपादनाच्या दृष्टिकोनातून न पाहता, संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे ध्येय ठेवावे. महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी करून कृषी शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ होण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगावी.
अकॅडमिक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती  दिली. विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधांसह महाविद्यालयाने विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावाही त्यांनी सादर केला.
कार्यक्रमास हेड फार्म ऑपरेशन्स इंजि. ए. बी. गाताडे, डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. के. एस. शिंदे व प्रा. एम. एन. केंगरे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज कुटे व स्वरूपा सुर्वे यांनी केले, तर आभार प्रा. एस. के. मयेकर यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर  डॉ. एस. बी. पाटील यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31 ° C
31 °
30.9 °
66 %
7.2kmh
0 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page