कोल्हापूर :
आपत्ती काळातील प्रतिसाद जीवित व वित्तहानी टाळू शकतो. आपल्या परिसरात घडणाऱ्या नैसर्गिक आणि मानवी घटना या जास्त तीव्रतेची बनल्यास जीवित आणि वित्त हानी घडून आपत्ती येऊ शकते. आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात आपण समय सुचकतेने प्रतिसाद देणे आवश्यक असते, असे मत नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबईच्या ट्रेनर साक्षी यादव
यांनी विद्यार्थ्यांसमोर आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थी सहभागाद्वारे स्पष्टीकरण दिले.
भारतासारख्या बहु विविधतेने नटलेल्या भागात महापूर, भूकंप, दुष्काळ, दरड कोसळणे, भूस्खलन, वनवा या आपत्ती येताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये होणाऱ्या हानीची तीव्रता कमी करण्यासाठी व भविष्यकालीन जोखीम संवेदनशील क्षेत्र ओळखण्यासाठी विद्यार्थी दशेतील हे विचार निश्चित सुरक्षित जगण्याला दिशा देतील असे मत ज्युनियर आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मांडले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून ज्ञात असलेल्या आपत्ती विषयीची माहिती जाणून घेऊन भविष्यकालीन योजनांसाठीची मानसिक तयारी करून घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले तर प्रा. सुभाष रानमाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी प्रतिनिधी कु. जयू पाटणे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्र. प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, रजिस्टार एस. के. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी आणि एनएसएस विभागाने केले. याप्रसंगी प्रा. सौ. एस. एन. ढगे, प्रा. एम. पी. गवळी, प्रा. अनिल धस, प्रा. डी. आर. पाटील, एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
——————————
विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
Mumbai
clear sky
31
°
C
31
°
30.9
°
66 %
7.2kmh
0 %
Tue
31
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°

