कोल्हापूर :
कोल्हापूर शहरास काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करून येथील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याला आपले प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस बळकटी येण्यासाठी धरण परिसरात महापारेषणचे सब स्टेशन स्थापन करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. क्षीरसागर म्हणाले, पाणीपुरवठा पुण्याच्या अनुषंगाने धरण क्षेत्रात महापारेषणचे सब स्टेशन होणे आवश्यक आहे. हे सब स्टेशन उभे करण्यासाठी एमएसईबीला किती कालावधी लागेल ? याचीही विचारणा त्यांनी केली.
वीज मंडळाने सब स्टेशनसाठी जागा फायनल करून त्याचा सुधारित आराखडा शासनाकडे पाठवावा. तसेच या सब स्टेशनसाठी धरण क्षेत्रातील जागा फायनल करून ती जागा उद्याच्या उद्या पाहून घ्यावी असे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले तर या सब स्टेशनसाठी वन (फॉरेस्ट) विभागाची जागा न घेता जलसंपदा विभागाची जागा घेतल्यास ती योग्य होईल असे मत मनपा आयुक्त राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले
यावेळी अतिरिक्त आयुक्त (मनपा) शिल्पा दरेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, श्री. कांबळे, महापारेषणचे अधिक्षक अभियंता अभिजीत धमाले, एमएसईबीचे (शहर) कार्य. अभियंता अभिजीत सिकणीस, महा पारेषणच्या कार्य.अभियंता स्मिता कुलकर्णी, मनपाचे उप अभियंता जयेश जाधव यांच्यासह वन,जलसंपदा आणि वीज मंडळाचे इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
——————————
कोल्हापूर शहराचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागर
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
4.6kmh
100 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

