Homeराजकियकेशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उदघाटन

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उदघाटन

• पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी
कोल्हापूर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रविवारी (दि.९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेने संपूर्ण कोल्हापूरकर आणि राज्यभरातील नाट्यप्रेमी हळहळले होते. मात्र, प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अवघ्या वर्ष-दीड वर्षाच्या विक्रमी कालावधीत नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाचे आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नाट्यगृहाचा मूळ ‘हेरिटेज लुक’ (ऐतिहासिक वारसा स्वरूप) कायम राखत, अत्यंत आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसह या वास्तूचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नूतनीकृत केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, यामुळे कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी गती मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण उदघाटन कार्यक्रम उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि प्रायव्हेट हायस्कूल येथील सभास्थळाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर सौ. रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात केवळ नाट्यगृहासह शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सीपीआर रुग्णालयात झालेल्या विविध अद्ययावत कामांचे लोकार्पण,  शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत हॉकी स्टेडियम आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या पार्किंग सुविधांचे उदघाटन करण्यात येणार आहे. नुकतेच गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आज कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे अनेक निर्णय आणि प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3 ° C
29.3 °
29.3 °
73 %
4.6kmh
90 %
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page