• वनप्रेमी व ट्रेकर्ससाठी टी-शर्ट, पॅन्ट, कॅपसह ट्रेकिंग साहित्य उपलब्ध
कोल्हापूर :
वनप्रेमी, पर्यटक व ट्रेकिंगप्रेमी नागरिकांसाठी कोल्हापूर वन विभागाच्या वतीने नागाळा पार्क, रमणमळा, मुख्य पोस्ट ऑफिससमोर ‘सोव्हेनियर शॉप’ सुरू करण्यात आले आहे. या शॉपचे उदघाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांच्या हस्ते आणि मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर श्रीमती लक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या सोव्हेनियर शॉपमध्ये वन विभागामार्फत टी-शर्ट, पॅन्ट, कॅप तसेच ट्रेकिंगसाठी आवश्यक विविध साहित्य अत्यंत अल्प व परवडणाऱ्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. वन पर्यटन, ट्रेकिंग आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याबरोबरच वन विभागाची ओळख व पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमास सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, कोयना वन्यजीव अभयारण्यचे संचालक किरण जगताप, विभागीय वन अधिकारी, दक्षता संजय वाघमोडे, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव कोल्हापूर श्रीकांत पवार तसेच वन विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर वन विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे वनप्रेमी व पर्यटकांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध होऊन निसर्ग पर्यटन व ट्रेकिंगला निश्चितच अधिक चालना मिळणार आहे असे उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर वन विभागाचे ‘सोव्हेनियर शॉप’ सुरू
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
73 %
4.6kmh
90 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°

